दिनांक 06 April 2020 वेळ 3:24 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दैनिक राजतंत्रच्या सोशल रिपोर्टींग कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्या !

दैनिक राजतंत्रच्या सोशल रिपोर्टींग कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्या !

सोशल मिडियाद्वारे पत्रकारिता समृद्ध करु या! लोकशाहीचा आधारस्तंभ बनू या!

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणारा मिडिया सशक्त आणि सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मिडियाची मोठी मदत होऊ शकते. त्याद्वारे प्रत्येक नागरिकाचा सहभाग उपयुक्त ठरु शकतो. यासाठी दैनिक राजतंत्र ” सोशल रिपोर्टर ” ही संकल्पना सादर करीत आहे. सोशल मिडियाचा वापर करणारा प्रत्येक जण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ठरु शकतो.
त्यासाठी सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. फेक न्यूजना आळा घालणे आवश्यक आहे. समाज आणि देश घडवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर झाला पाहिजे. सोशल मिडिया आणि त्याचा वापर करणाऱ्यांची उर्जा आम्ही विधायक मार्गाने गेल्यास आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करु शकतो. त्यासाठीच्या आमच्या योजनेत सहभागी व्हा!

दैनिक राजतंत्र आयोजित करीत आहे
एक दिवसीय (45 मिनिटांच्या 9 तासिका) सोशल रिपोर्टींग कार्यशाळा

कार्यशाळेद्वारे शिकवला जाणारा अभ्यासक्रम
(45 मिनिटांच्या 3 तासिका)
1. भारताचे संविधानाचा परिचय, अनुच्छेद 19 क आणि माहितीचा अधिकार
2. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया व त्याची कार्यपद्धती
3. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने निर्देशित केलेली मार्गदर्शक तत्वे.
(15 मिनिटांचा ब्रेक व त्यानंतर 45 मिनिटांच्या 3 तासिका)
4. बातमी लेखनाची तत्वे
5. बातमी लेखनाचे तंत्र
6. फेक न्यूजला आळा कसा घालायचा?
(45 मिनिटांचा ब्रेक व त्यानंतर 45 मिनिटांच्या 2 तासिका)
7. पोलीस प्रशासन, भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा.
8. न्याय व्यवस्था व अब्रूनुकसानीचे दावे
9. शंका निरसन व समारोप


प्रत्येक यशस्वी प्रशिक्षणार्थीला ६ महिने मुदतीचे ओळखपत्र व सोशल रिपोर्टींगचा प्रत्यक्षातील अनुभव दिला जाईल. त्यानंतर निवडक पात्र उमेदवारांना दैनिक राजतंत्रचे नियमित सोशल रिपोर्टर बनण्याची संधी देखील मिळू शकते.

या प्रशिक्षणानंतर आपण अधिक सक्षम व सकसपणे पत्रकारिता करु शकाल.
शुल्क अवघे 500 रुपये

संजीव जोशी
संपादक – दैनिक राजतंत्र
9890359090
[email protected]

comments

About Rajtantra

Scroll To Top