दिनांक 18 January 2020 वेळ 12:43 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वाड्यात प्रशिक्षण मेळावा

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वाड्यात प्रशिक्षण मेळावा

  • स्वयंसहायता बचत गटांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री
  • हजारो महिलांची उपस्थिती; बचतगटांचा सहभाग

बचतगटाच्या उत्पादनाला व्यापारचिन्ह देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील! -चंद्रकांत वाघमारे

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण्याच्या उद्देशाने वाडा पंचायत समिती व उमेद संस्थेच्या माध्यमातून महिला प्रशिक्षण मेळावा वाड्यातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शनिवारी (दि. 7) आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यरत असलेल्या स्वयंसहायता महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या माध्यमातून विविध उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली.

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना अर्थसहाय्य करून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या महिलांमध्ये व्यवसायीक दृष्टीकोण निर्माण व्हावा यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. महिला उत्पादन करत असलेल्या उत्पादनाला ब्रँड देऊन शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात जिल्हा परिषद पुढाकार घेईल, असे पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले. मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी, वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील, गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करीत आहोत. -निलेश गंधे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पालघर

comments

About Rajtantra

Scroll To Top