दिनांक 18 January 2020 वेळ 11:45 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोर : दमण बनावटीच्या दारुची वाहतूक करणार्‍या तिघांना अटक

मनोर : दमण बनावटीच्या दारुची वाहतूक करणार्‍या तिघांना अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/मनोर, दि. 6 : कारमधुन विनापरवाना दमण बनावटीच्या बियरच्या साठ्याची वाहतूक करणार्‍या 3 जणांना मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल, गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील हालोली जिवदानी हॉटेल येथे ही कारवाई करण्यात आली.

भरत राममुरत पाल (वय 29), दिपक राजकुमार पाल (वय 24) व दिपक भरत जैस्वाल (वय 23, सर्व रा. गुजरात) असे तिघे जण जी.जे.15/सी.ए.3087 या क्रमांकाच्या सेंट्रो झिंग कारमधुन 9 हजार 800 रुपये किमंतीचा 144 बियरच्या टिनचा साठा गुजरातहून मुंबईच्या दिशेने घेऊन चालले होते. पोलिसांनी या कारला अडवून चौकशी केली असता या तिघांकडे कोणत्याही प्रकरचा दारु वाहतूकीचा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर बियरचा साठा, कार व तिघांनाही ताब्यात घेतले असुन त्यांच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 65(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top