दिनांक 18 January 2020 वेळ 11:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईतील अंबाडी रोडवरील लेडीज बारवर छापा

वसईतील अंबाडी रोडवरील लेडीज बारवर छापा

14 बारबालांसह हॉटेल कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा

संग्रहित छायाचित्र

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 6 : वसई पश्‍चिमेतील अंबाडी रोड (पंचवटी नाका) येथील संगीत बार नामक लेडीज बारवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत 14 बारबालांसह हॉटेलचा मॅनेजर व दोन वेटर अशा एकुण 17 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटकडून 4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने जेव्हा येथे छापा टाकला तेव्हा येथे 20 ते 32 वयोगटातील एकुण 14 बारबाला विभत्स हावभाव व अंगविक्षेप करीत ग्राहकांशी लगट करताना आढळून आल्या. तर हॉटेलचा मॅनेजर शामदेव खिरुदास यादव (वय 30) तसेच वेटर हरिष कुट्टी शेट्टी (वय 46) व कृष्णा मुक्ता देवाडीगा (वय 42) हे ग्राहकांना सेवा देताना आढळून आले. यानंतर 14 बारबालांसह हॉटेलचा मॅनेजर व दोन वेटर विरोधात माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजर व वेटर्स विरोधात बारबालांना अश्‍लिल कृत्य करण्यास प्रोत्साहित करणे तसेच परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन भारतीय दंड विधान संहितेचे कलम 294 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी येथून 61 हजार 860 रुपयांची रोख रक्कम देखील जप्त केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top