दिनांक 18 January 2020 वेळ 12:36 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा शहर रस्ता रुंदीकरणाला अखेर मुहूर्त सापडला

वाडा शहर रस्ता रुंदीकरणाला अखेर मुहूर्त सापडला

दोन महिन्यात पूर्ण होणार काम

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर मुहूर्त सापडला असून गुरुवारी (दि. 5) रात्री पासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अडथळे व अतिक्रमित जागा मोकळी करण्यास सुरुवात करुन दोन महिन्यात शहरातील रस्तारुंदीकरण करण्यात येणार असल्याचे वाडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उप अभियंता प्रकाश पातकर यांनी सांगितले.

पालघर – वाडा – देवगाव या राज्य महामार्ग 34 अंतर्गत येणार्‍या वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते देसई नाका या 1200 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून या रस्ताच्या रुंदीकरणामुळे शहरातील काही व्यापार्‍यांचे रुंदीकरणामुळे नुकसान होणार असल्याने त्यांचा या कामाला विरोध होता. त्यामुळे आपले जास्त नुकसान होऊ नये म्हणून कमी रुंदीकरण व्हावे, अशी व्यापार्‍यांची मागणी असल्याने गेले दीड ते दोन वर्षांपासून रस्ता रुंदीकरणास सार्वजनिक बांधकाम विभागालामुहुर्तच सापडत नव्हता. परंतु स्थानिक नागरिक व तालुक्यातून शहरात येणार्‍या नागरिकांना शहरातील या अरुंद मुख्य रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याने रस्तारुंदीकरण व्हावे, अशी त्यांची मागणी होती. अखेर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्रीपासूनच रस्ता रुंदीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.

हा रस्ता अ‍ॅन्युटी अंतर्गत मंजूर असून 15 मीटर रुंद होणार आहे. यामध्ये दोन्ही बाजूस एक एक मीटरच्या गटारी, रस्त्याच्या मधील 5.50 मीटर काँक्रिट रस्ता व दोन्ही बाजूस 3.75 मीटरचा डांबरी रस्ता करण्यात येणार आहे. जिजाऊ कंस्ट्रक्शन या ठेकेदार कंपनी मार्फत या रस्त्याचे काम करण्यात येणार असून 15 वर्षे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची असणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top