दिनांक 18 January 2020 वेळ 11:10 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाड्यात तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा संपन्न!

मोखाड्यात तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा संपन्न!

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 5 : मोखाडा तालुका अंतर्गत असणार्‍या खोडाळा विभागातील सुर्यमाळ, किनिस्ते, डोल्हारा, वाकडपाडा, पाथर्डी आणि खोडाळा या केंद्रांतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधुन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा नुकत्याच सूर्यमाळ केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ होते.

निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या सुर्यमाळ केंद्र शाळेच्या प्रशस्त क्रिडांगणात नियोजनपुर्वक या क्रिडास्पर्धा पार पडल्या. प्रारंभी तालुक्याचे विद्यमान सभापती प्रदिप वाघ यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन क्रिडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी सुर्यमाळ ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश राथड, ग्राम पंचायत सदस्य तथा सुर्यमाळ केंद्राच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ हमरे व इतर सदस्य, देवराम पेहरे, बाळु लाव्हरे, योगिता हमरे, कमल बदादे, संजय हमरे यांच्यासह सुर्यमाळ येथील प्रतिष्ठित नागरीक व शिक्षणप्रेमी शिवराम हमरे तसेच गट शिक्षण अधिकारी रामचंद्र विशे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी शिवदास पवार, हेमलता गारे व सुमन धादवड यांनी या स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

क्रिडास्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी खोडाळा केंद्राचे केंद्रप्रमुख वामण पाडेकर, किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख नागु विरकर तसेच खोडाळा विभागाचे माजी तालुका मास्तर शिवराम झोले यांनी विशेष परिश्रम घेतले. तर रविंद्र विशे, दिनकर फसाळे, राजाराम जोशी, मनोज झंजाड, लालासाहेब धायगुडे, शितल पाटील, शरद सुर्यवंशी, पुंडलिक पाटील, कांचन सोनटक्के, निकिता गोस्वामी यांच्यासह सर्वच शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

comments

About Rajtantra

Scroll To Top