दिनांक 18 January 2020 वेळ 12:22 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ग्रामपंचायत पोट निवडणूका : संबंधित ग्रामपंचायत हद्दींमध्ये आचारसंहिता लागू

ग्रामपंचायत पोट निवडणूका : संबंधित ग्रामपंचायत हद्दींमध्ये आचारसंहिता लागू

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 : पालघर जिल्ह्यातील 79 ग्रामपंचायतींमधील 175 सदस्य पद व 2 थेट सरपंच पदांसाठी पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 8 डिसेंबर रोजी या निवडणुका पार पडणार असुन 9 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्‍वभुमीवर संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आज, 4 डिसेंबरपासुन 12 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागु करण्यात आली आहे.

तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात काही राजकीय पक्ष किंवा संघटनांचे कार्यकर्ते, प्रतिनिधींकडून सार्वजनिक शांततेचा व सुरक्षेचा भंग करुन निवडणुक प्रक्रियेस बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बेकायदेशीर जमाव जमुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अथवा सार्वजनिक शांतता व सुरक्षेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता अशा संभाव्य अपप्रक्रियांना प्रतिबंध घालणे जरुरीचे असल्याने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेले विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, मतदान तसेच अंध व अपंग मतदारांबरोबर आलेल्या नातेवाईकांखेरीज बेकायदेशीर जमावास मतदान केंद्र व मतमोजणीच्या केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम 144(1)(2)(3) अन्वये 8 ते 9 डिसेंबर अशा दोन दिवसांच्या कालावधीत प्रवेश करण्यास मनाई आदेश लागु करण्यात आला असल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अधिसुचेनेद्वारे सांगितले आहे.

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर
मतदान असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मतदारांना मतदान कार्यक्रमात सहभाग घेता यावा म्हणून विविध खाजगी आस्थापना, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी अर्थात 8 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा उद्योगातील कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, अशा सुचना कामगार अधिकार्‍यांनी संबधित आस्थापनांना दिल्या आहेत, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. शिंदे यांनी अधिसूचनेद्वारे सांगितले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top