दिनांक 21 January 2020 वेळ 6:04 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » महामार्गावर 24.71 लाखांचा गुटखा जप्त

महामार्गावर 24.71 लाखांचा गुटखा जप्त

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 2 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीत दोन आयशर टेम्पोमधुन एकुण 24 लाख 71 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने ही कारवाई केली असुन काल, रविवारी (दि.1) एम.एच.05/ए.एम. 4044 व एम.एच 48/ए.वाय. 8254 या क्रमांकांच्या टेम्पोंमधुन हा गुटखा मुंबई येथे विक्रीसाठी नेण्यात होता. दरम्यान, याप्रकरणी मोहम्मद आदील मोहम्मद तारीख शेख (वय 25) व दादाराव ज्ञानोबा काळे (वय 44) अशा दोन्ही टेम्पोचालकांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्याविरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top