दिनांक 08 December 2019 वेळ 9:01 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसरमध्ये दुचाकी चोरटा गजाआड; तीन दुचाकी हस्तगत

बोईसरमध्ये दुचाकी चोरटा गजाआड; तीन दुचाकी हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 2 : बोईसरमधील विविध भागातून दुचाकी चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला असुन या चोरट्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामनंदन ऊर्फ बिल्ला गणेश पासवान (वय 19 वर्षे, रा.धोडीपूजा) असे सदर चोरट्याचे नाव आहे.

30 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव यांना दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान बिल्ला पासवानबाबत गुप्त माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर त्याच्याकडून बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केलेली 76 हजार रुपये किंमतीची युनिकॉर्न व 65 हजार रुपये किंमतीची होन्डा शाईन अशा दोन तर मनोर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केलेली 20 हजार रुपये किंमतीची अ‍ॅक्टीवा स्कुटी अशा तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी बिल्ला पासवान विरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, बिल्ला पासवान या अटक करण्यात आलेल्या चोरट्याविरोधात गुजरातमधील उमरगांव पोलीस स्टेशनमध्येही दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top