दिनांक 08 December 2019 वेळ 10:36 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » निवृत्त कर्मचार्‍यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ

निवृत्त कर्मचार्‍यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ

पालघर पंचायत समिती शिक्षण विभागाचा निर्णय

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 1 : शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पीएफ व उपदान मिळावे यासाठी काही कालावधी जातो. परंतु पालघर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने निवृत्त कर्मचार्‍यांचा हा त्रास कमी व्हावा म्हणून एक नवीन पायंडा पाडण्याचे ठरवले आहे. कर्मचारी ज्या दिवशी निवृत्त होईल, त्याच दिवशी पीएफ व उपदानाचे धनादेश त्यांना देण्यात येतील. काल, शनिवारी हा निर्णय घेण्यात आला असुन कालच या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली. केंद्रप्रमुख (टीएपीएस) प्रकाश पिंपळे शनिवारी शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झाले असता शिक्षण विभागाने पिंपळे यांना पीएफ व उपदानाचे धनादेश पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चन्द्रशेखर जगताप व गटशिक्षणाधिकारी राजेंद्र खताळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी खताळ यांनी यापुढे शिक्षण विभागातील प्रत्येक निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍याला निवृत्तीच्या दिवशीच धनादेशांचे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी लेखाधिकारी गोपाल थोरात, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर संखे व सरचिटणीस भालचंद्र संखे उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top