विश्वासदर्शक ठरावादरम्यान डहाणूचे आमदार तटस्थ

0
431

प्रतिनिधी/डहाणू, दि. 1 : शनिवारी (दि.30) विधानसभेत नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान, डहाणू 128 विधानसभा (अ.ज.) मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद भिवा निकोले हे तटस्थ राहिले. यावर पत्रकारांशी बोलताना, महाविकास आघाडीने तयार केलेल्या समान किमान कार्यक्रमात आदिवासी जनतेच्या प्रश्नाचा साधा उल्लेख देखील नाही. त्याबरोबरच असंघटित आणि कंत्राटी कामगारांची उन्नती, मच्छिमारांचे आणि शेतकर्‍यांचे प्रश्न याविषयी सरकारच्या समान किमान कार्यक्रमात भूमिका स्पष्ट नसल्या कारणाने आपण तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार निकोले यांनी स्पष्ट केले.

Print Friendly, PDF & Email

comments