
प्रतिनिधी/वाडा, दि. 1 : वाडा शहरासाठी असलेले डम्पिंग ग्राऊंड अन्यत्र स्थलांतरीत करण्यात यावे या मुख्य मागणीसह शहरातील खड्डेयुक्त रस्ते, पार्किंग अभावी होणारी वाहतूक कोंडी, नादुरुस्त व जुनी झालेली कचरा वाहतूकीची वाहने आदी समस्यांबाबतचे निवेदन वाडा शहर भाजपच्या वतीने नगरपंचायतीला देण्यात आले आहे.

वाडा शहराचे डम्पिंग ग्राऊंड सद्यस्थितीत वैतरणा (सिद्धेश्वरी) नदीलगत असून याच नदीतील पाणी शहराला पाणी पुरवठा योजनेद्वारे पुरविले जात आहे. डम्पिंग ग्राऊंड नदीपात्राच्या लगतच असल्याने कचर्याचे घाण पाणी नदीपात्रात उतरून पाणी अशुद्ध होत असल्याचा आरोप करुन डम्पिंग ग्राऊंड या ठिकाणाहून अन्यत्र स्थलांतरीत करावे, नगर पंचायतीकडे शहरातील कचरा उचलण्यासाठी असलेले ट्रॅक्टर व ट्रॉली खूप जुन्या व जीर्ण झाल्यामुळे कचरा नेताना बराच कचरा रस्त्यावर पडून सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्यामुळे या वाहनांची तातडीने दुरुस्ती व्हावी, शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्यांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत असल्यामुळे पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यांखालून शहराला पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईन फुटल्याने बर्याच ठिकाणी दलदल तयार होऊन नागरिकांना या रस्त्यांवर चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्वरीत फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करुन शहरातील रस्ते सुस्थितीत करावे, आदी मागण्या भाजप शहर शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे केल्या आहेत.
भाजपचे शहर अध्यक्ष स्वप्नील रोठे व सरचिटणीस हर्षल खांबेकर यांनी नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा विशाखा पाटील यांच्याकडे या समस्यांबाबतचे निवेदन दिले असून यावेळी गटनेते मनिष देहेरकर, नगरसेविका अंजनी पाटील, भाजपचे रोहन पाटील, भानुदास भानुशाली, महिला आघाडीच्या शुभांगी उतेकर आदी उपस्थित होते.
- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वाड्यात प्रशिक्षण मेळावा
- अन्नदिनाचे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर
- तलासरी : दरोड्यातील आरोपींना पाच वर्षांची शिक्षा
- अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आणखी एका आरोपीला कारावास
- राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्वाची गरज; रेखाताई पष्टेंना विधान परिषद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी