दिनांक 20 February 2020 वेळ 9:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू : वरवाडा आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

डहाणू : वरवाडा आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

वार्ताहर/डहाणू, दि. 1 : डहाणू तालुक्यातील घाट (पाटीलपाडा) येथील कु. सारिका रघु पाटकर या 16 वर्षीय विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारिका ही वरवाडा आश्रम शाळेत इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती. मात्र अभ्यास झेपत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

डहाणू तालुक्यातील पाटीलपाडा येथील चार मैत्रिणींनी आपले दहावीपर्यंतचे एकत्र शिक्षण घेतल्यानंतर डहाणू आदिवासी एकात्मिक प्रकल्प अंतर्गत असलेल्या वरवाडा आश्रम शाळेत इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला होता. त्यापैकी सारिका ही एक होती. काही दिवसांपूर्वी शाळेत क्रीडा स्पर्धा सुरू असताना या चौघींनी चिठ्ठी लिहून घरी जात असल्याचे सांगत आश्रमशाळेतून पलायन केले होते. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी तलासरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तीन विद्यार्थीनी त्यांच्या नातेवाईकांकडे सापडल्या. तर सारिका पाटकर हिने शुक्रवारी आत्महत्या केल्याचे समोर आले. आईबरोबर शेतावर गेलेली सारिका एकटीच घरी परतली आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर विज्ञान शाखेचा अभ्यास कठीण जात असल्याने तसेच वर्गात हजर असताना देखील आमची हजेरी लावत नसल्याचे इतर तीन मुलींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितल्याचे समजते.

त्यामुळे अभ्यास झेपत नसल्याने सारिकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणाची तलासरी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top