वाडा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न

0
4

प्रतिनिधी/कुडूस, दि. 29 : वाडा तालुक्यातील तानसा ग्लोबल स्कूल (घोणसई-मेट) येथे वाडा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधील कर्तुत्ववान शिक्षकांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. दरम्यान, तानसा ग्लोबल स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले असुन तीन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनात अनेक विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे व सभापती अश्विनी शेळके यांच्या हस्ते झाले.

डाकिवली शाळेतील आदर्श शिक्षक रतिश अनंता भोईर, दाभोण शाळेतील आत्माराम धाटे, वरई शाळेचे प्रल्हाद कोळी, तुसे शाळेतील रविंद्र घोलवड, चंद्रपाडा येथील सुरेश कांबळे, ऐनशेत शाळेतील शिक्षिका दिशा पाटील, खैरे येथील प्रिया पाटील, गौरापुर येथील दशरथ डबके, करंजपाडा शाळेचे दिपक शनवारे, मल्याणपाडा कुडूस येथील अजित काळे आदींसह चिंचघर शाळेच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका रोशनी रामचंद्र भोईर, जिल्हा व राज्य स्तरावर बाँडीबिल्डर चँम्पियनशिप पटकावणारे तसेच भारत उदय श्री व महाराष्ट्र श्री किताब प्राप्त शिक्षक गणेश मारूती जाधव आदी शिक्षकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून वाडा तालुका सभापती शेळके उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष गंधे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी, वाडा पंचायत समिती उपसभापती मेघना पाटील, जिल्हा परिषद सदस्य किर्ती हावरे, स्नेहा जाधव, अरूण अधिकारी, निमा पाटील व गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, गटशिक्षणाधिकारी खोतसर, तानसा ग्लोबल स्कूलच्या प्रा. फॅबिना मॅडम, संस्थापक अध्यक्ष मंगेश चौधरी तसेच केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सभापती शेळके यांनी, विज्ञान प्रदर्शनातील मुलांनी बनविलेल्या प्रतिकृती पाहून समाधान व्यक्त केले व सर्व शाळा डिजिटल केल्याबद्दल शिक्षकांना तसेच केंद्र प्रमुख गुरूनाथ पष्टे यांनी रोटरीच्या माध्यमातून शाळांना टिव्ही, कँप्युटर व डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद दिले. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गंधे यांनी शिक्षकांच्या समस्या व उर्वरित कामे राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. उपसभापती मेघना पाटील यांनीही ओघवत्या शैलीत शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना चौधरी व जितेंद्र पाटील यांनी केले. तर आभार गो.दा. पाटील यांनी व्यक्त केले.क्त केले.

Print Friendly, PDF & Email

comments