दिनांक 21 February 2020 वेळ 11:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईतील प्रेमीयुगुलाची वाड्यात आत्महत्या

वसईतील प्रेमीयुगुलाची वाड्यात आत्महत्या

केळठण येथील घटना

प्रतिनिधी/कुडूस, दि. 28 : वसई तालुक्यातील योजना पारधी व नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी (दि.27) दुपारच्या सुमारास वाडा तालुक्यातील केळठण गावच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असुन कुटूंबियांचा त्यांच्या लग्नास विरोधात असल्याने दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंता पारधी (वय 17) ही तरूणी वसई तालुक्यातील माजिवली येथील, तर नितीन भुजड हा करंजोन वरंजाडपाडा येथील रहिवासी होता. योजना सातिवली येथील एका कंपनीत कामाला होती. ती नेहमीप्रमाणे मंगळवारी कामाला गेली मात्र घरी परतलीच नाही. दुसर्‍या दिवशी तिने आपल्या घरी फोन करून मी आता कधीच परत घरी येणार नाही, असे तिच्या बहिणीला सांगितले. त्यानंतर तिची शोधाशोध केली असता ती वाड्यातील केळठण गावच्या हद्दीत बेशुद्ध अवस्थेत सापडली. यावेळी तिच्या सोबत नितीन भुजड (वय 22) हा तरूणही बेशुद्ध अवस्थेत सापडला. दोघांना तत्काळ वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लग्नास घरच्यांनी विरोध केला म्हणून दोघांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात असून वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दोरकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top