दिनांक 08 December 2019 वेळ 9:04 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » खळ्यातील भाताच्या भार्‍यांना आग; वाड्यातील शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान

खळ्यातील भाताच्या भार्‍यांना आग; वाड्यातील शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी/वाडा, दि. 27 : तालुक्यातील गौरापूर गावातील शेतकरी बाळकृष्ण राऊत यांच्या खळ्यातील भाताच्या भार्‍यांना अचानक आग लागून 800 भारे जळून खाक झाले असून यात त्याचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आज, बुधवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अवेळी पडणार्‍या पावसाने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. त्यात हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बाळकृष्ण राऊत हा शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. सदरचे भाताचे काही भारे राऊत यांनी घरामध्ये साठविले होते. मात्र त्यांच्या आईचे निधन झाल्याने उत्तरकार्य असल्याने भाताचे भारे त्यांनी घरासमोरील अंगणात ठेवले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास या भाताच्या भार्‍यांना अचानक आग लागून सर्व भारे जळून खाक झाले आहेत.

महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून संबंधित शेतकर्‍याला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले.

दरम्यान ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा बाळकृष्ण राऊत यांचा संशय असून याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top