दिनांक 21 February 2020 वेळ 1:06 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाड्यातील 13 हजार शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा फटका

मोखाड्यातील 13 हजार शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा फटका

  • 5 हेक्टर शेतीचे नुकसान
  • सुमारे 2 कोटी 85 लाखांच्या निधीची मागणी

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 24 : परतीच्या आणि अवकाळी पावसाने मोखाडा तालुक्यातील सुमारे 4 हजार 900 हेक्टर शेतीमधील भात, नागली आणि वरई या मुख्य नगदी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सरकारी अहवालावरून समोर आली आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी मोखाड्यावर दुष्काळाचे सावट ओढवले असुन त्याचा फटका सुमारे 12 हजार 919 शेतकर्‍यांना बसला आहे. दरम्यान, या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई म्हणून सुमारे 2 कोटी 84 लाख 65 हजार रूपयांच्या निधीची मागणी कृषी विभागाने सरकारकडे केली आहे.

ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने तालुक्यातील 700 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करून सरकारी मदत म्हणून हेक्टरी 8 हजार 600 इतकी रक्कम जाहीर झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत ही मदत शेतकर्‍यांच्या पदरी पडलेली नाही. या संकटापाठोपाठ परतीच्या आणि अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. सुमारे 12 हजार 919 शेतकर्‍यांचे 4 हजार 186 हेक्टर शेतीमधील भात, नागली आणि वरई या नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऑगस्टमधील 700 हेक्टर व आता 4 हजार 186 हेक्टर असे एकूण 4 हजार 886 हेक्टर शेतीमधील पिकांचे नुकसान झाले आहेे. तर कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई म्हणून 2 कोटी 84 लाख 65 हजार रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असुन सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

ऑगस्टमध्ये 700 हेक्टर भातशेतीचे आणि आता परतीच्या आणि अवकाळी पावसाने 4 हजार 186 हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे केले असुन शासनाकडे निधीची मागणी केली आहे. तसेच पिकपाहणी दोन टप्प्यांत झाली असुन कापणीनंतरची शेवटची पाहणी बाकी आहे.
-बालाजी सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी.

comments

About Rajtantra

Scroll To Top