पालघर येथे ईपीएस-95 पेन्शनधारकांचा मेळावा संपन्न

0
3
  • जिल्ह्यातील किमान पाचशे पेन्शनधारक आंदोलनासाठी दिल्लीत धडकणार
  • पेन्शनधारकांचा प्रश्‍न संसदेत मांडणार! -खा. गावित

वार्ताहर/बोईसर, दि. 24 : ईपीएस-95 पेन्शधारकांच्या व्यथा समजून केंद्र सरकारने भगतसिंग कोशियारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी न केल्यास देशभरातील 65 लाख पेन्शधारक व 12 कोटी सभासदांना निवडणूकांवर बहिष्काराचे अस्त्र उगारावे लागेल, असा इशारा ईपीएस-95 पेन्शधारक समन्वय समितीचे राष्ट्रीय सरचिटणिस प्रकाश पाठक यांनी दिला. त्यावर पेन्शनधारकांचा प्रश्‍न संसदेत उठवणार असुन प्रत्येक लढ्यात मी तुमच्यासोबत असेल, असे आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी दिले.

5 डिसेंबर 2019 रोजी दिल्ली येथे होणार्‍या आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी पालघर येथे ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावित यांनी हे आश्‍वासन दिले. या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या. तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनायक गोडसे, उपाध्यक्ष हेमंत पाटील, सी.टी. पाटील, रविंद्र चाफेकर, श्रीम. परब, सरचिटणिस प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष अशोक राऊत, खजिनदार रविंद्र कदम आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातुन किमान पाचशे पेन्शनधारक 5 डिसेंबर रोजी दिल्लीला धडक देतील, असा निर्धार करण्यात आला. दरम्यान, याप्रसंगी ईपीएस-95 पेन्शधारक समन्वय समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनायक गोडसे व कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल ताहाराबादकर यांचा खा. राजेंद्र गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email

comments