दिनांक 08 December 2019 वेळ 9:45 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » शिवसेनेच्या वतीने आदिवासी कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप

शिवसेनेच्या वतीने आदिवासी कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, रविवारी (दि. 17) तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने मायेची उब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

शिवसेनेचे पालघर जिल्हा सह समन्वयक गोविंद पाटील यांच्या पुढाकाराने व नवनिर्माण कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने तालुक्यातील नांदणी व अबंरभुई येथील 70 आदिवासी कुटुंबियांना बँल्केट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका सचिव निलेश पाटील, वाडा शहर प्रमुख नरेश चौधरी, भरत हजारे, कुडूस विभागप्रमुख जनार्दन भरे, विभागीय उप तालुकाप्रमुख नरेंद्र जाधव, कुडुस उपविभागप्रमुख संतोष पाटील व नांदणी येथील सेना कार्यकर्ते सुरेश राव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top