दिनांक 04 July 2020 वेळ 12:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नालासोपार्‍यात नायजेरियनकडून 4 लाखांचे कोकेन जप्त!

नालासोपार्‍यात नायजेरियनकडून 4 लाखांचे कोकेन जप्त!

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 15 : नालासोपारा पुर्वेतील प्रगतीनगर भागातून तुळींज पोलिसांनी 4 लाखांचे कोकेन जप्त केले असुन याप्रकरणी एका नायजेरियन नागरीकाला अटक केली आहे. जोसेफ चुकवा (वय 40) असे सदर नायजेरियनचे नाव असुन त्याच्याविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास तुळींज पोलिसांनी जोसेफ चुकवा याच्या प्रगतीनगर येथील के.डी.एस अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांनी त्याच्या घराची झडती गेतली असता 82 ग्रॅम कोकेन आढळून आले. या कोकेनची बाजारभावानुसार 4 लाख रुपये इतकी किंमत आहे. यांनतर पोलिसांनी जोसेफ चुकवाला अटक करत त्याच्याविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्याचे कलम 8(क) सह 21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, नायजेरियन नागरीकांकडून अमली पदार्थांची तस्करी व विक्रीच्या शक्यतेवरुन नुकतेच पालघर पोलिसांनी नायजेरियनसह बांगलादेशी नागरीकांना घरे भाड्याने देताना त्यांची संपुर्ण माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक केले आहे. तसेच या आदेशाचा भंग करणार्‍या घरमालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

वसईत सोडतीन किलो गांजासह 2 जणांना अटक

वसई, दि. 15 : स्कुटीच्या डिक्कीतुन चोरट्या पध्दतीने गांजा या अमली पदार्थाची वाहतूक करणार्‍या दोन जणांना वालीव पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्याकडून 54 हजार रुपये किंमतीचा 3 किलो 500 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.

काल, गुरुवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास मोहम्मद वाहिद शमीम शेख (वय 22) व प्रकाश श्रीकांत थापा (वय 47, दोघे रा. नायगाव पुर्व) हे दोघे त्यांच्याकडील स्कुटीच्या डिक्कीमधून चोरट्या पद्धतीने साडेतीन किलो वजनी गांजाची वाहतूक करत होते. नायगांव पुर्वेतील वामन फॅमिली रेस्टॉरंटसमोरील रस्त्यावर वालिव पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवून तपासणी केल्यानंतर सदर गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक करत त्यांच्याविरोधात वालिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.

21 हजारांचा गुटखा पकडला

नालासोपारा, दि. 15 : तुळींज पोलिसांनी काल, गुरुवारी गुटखा विक्री करणार्‍या एका व्यापार्‍याला ताब्यात घेत त्याच्याकडून 21 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. प्रशांत अजित मन्ना (वय 28, रा. नवघर) असे सदर व्यापार्‍याचे नाव आहे. प्रशांत मन्ना हा आपल्या एम.एच.48/ए.जे.9755 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन गुटखा विक्रीसाठी नेत होता. मात्र तुळींज पोलिसांनी पाचआंबा येथे त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून 21 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top