दिनांक 04 July 2020 वेळ 12:43 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » शिक्षक सेनेतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला मदतीचा हात

शिक्षक सेनेतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला मदतीचा हात

डहाणूतील बेंडगाव केंद्रात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे केले वाटप

प्रतिनिधी/डहाणू, दि. 15 : बालदिन तथा जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त काल, गुरुवारी (दि.14) मदतीचा एक हात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला साथ या संकल्पनेतून डहाणू तालुका शिक्षक सेनेमार्फत गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर व बसण्यासाठी आसनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. डहाणू तालुक्यातील बेंडगाव केंद्रात मान्यवरांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीकोनातुन मदत करणे हा उदात्त भाव जोपासण्यात आला. बालदिनानिमित्ताने अशाप्रकारे कार्यक्रम राबवून संपूर्ण कोकणात तसेच मुंबई विभागातील बहुतांश शाळांतील गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षकसेनेचे डहाणू जिल्हा संपर्कप्रमुख जयदिप पाटील, तालुका अध्यक्ष विठ्ठल ठाणगे, सरचिटणीस भूषण ठाकूर, संपर्कप्रमुख हुसेन शेख, सहसंघटक अनिल घुले, शाळेतील शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डहाणू तालुका गटशिक्षणाधिकारी रावते, विस्तार अधिकारी वाघ तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख शेतसंदी यांनी मोलाचे सहकार्य केले. तर शिक्षक सेनेचे तालुका पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top