
राजतंत्र न्युज नेटवर्क/सफाळे, दि. 14 : मागील महिन्यात सफाळे येथील नवघर गावातील एका घरात सशस्त्र दरोडा घालून 42 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेणार्या 9 दरोडेखोरांना अटक करण्यात सफाळे पोलिसांना यश आले असुन या दरोडोखोरांकडून लुटून नेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी नवघर गावात राहणारे फिर्यादी व त्यांची पत्नी रात्री 9.30 च्या सुमारास जेवण करत असताना अचानक चार अज्ञात इसम त्यांच्या घरात शिरले होते. यावेळी काही समजण्याच्या आतच या दरोडेखोरांनी स्वत:कडील चाकूचा धाक दाखवून तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत फिर्यादींना हमे पैसा और सोना चाहीए, नही तो तुम्हे मारेंगे असे म्हणून फिर्यादींच्या पत्नीच्या कानातील सोन्याचे कर्णफुले, गळ्यातील मंगळसुत्र तसेच घरात ठेवलेली साडेचार हजारांची रोख रक्कम व 3 मोबाईल, असा 42 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला होता. यानंतर दोघांनाही बाथरुममध्ये हातपाय बांधून कोंडून ठेऊन दरवाजाला बाहेरुन कडी लावून पळ काढला होता. यानंतर दोघा पती-पत्नीने कशीबशी आपली सुटका करुन सफाळे पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी 4 अज्ञात इसमांविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 394, 342, 452, 323, 34 अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, दरोडेखोरांनी गन्ह्यानंतर मागे कोणताही पुरावा न सोडल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण व कौशल्यपुर्ण तपास केल्यानंतर अखेर काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले व यावरुन दरोडा घालणारे चौघे व त्यांच्यासोबत या गुन्ह्यात सामिल असलेले 5 जण अशा एकुण 9 जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
गणेश बबन आडगा (वय 23), राजेश मधुकर खाचे (वय 20), कल्पेश दशरथ आतकरी (वय 21), विशाल उर्फ बाक्या दशरथ आतकरी (वय 19), गोकुळ देवराम घाटाळ (वय 29), विपीन सुदाम बाबर (वय 27), विकास संतोष घाटाळ (वय 21), हितेश जयराम खाचे (वय 20), रुचित उर्फ रुतिक अनंता खाचे (वय 19) अशी सदर दरोडेखोरांची नावे असुन सफाळे पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वाड्यात प्रशिक्षण मेळावा
- अन्नदिनाचे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर
- तलासरी : दरोड्यातील आरोपींना पाच वर्षांची शिक्षा
- अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आणखी एका आरोपीला कारावास
- राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्वाची गरज; रेखाताई पष्टेंना विधान परिषद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी