दिनांक 03 July 2020 वेळ 5:02 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालयात रोजगार मेळव्याचे आयोजन

दांडेकर महाविद्यालयात रोजगार मेळव्याचे आयोजन

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर दि. 14 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, रोटरी क्लब पालघर व सोनपंत दांडेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. 16) रोजी सकाळी 10 वाजता येथील सोनोंपत दांडेकर महाविद्यालयात प. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या मेळाव्यास परिसरातील 15 ते 20 नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदांसह उपस्थित राहून उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड करणार आहेत. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण देणार्‍या शासनाने नियुक्त केलेल्या संस्था उपस्थित राहून उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करणार आहेत. तसेच उमेदवारांना त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उमेदवारांना व्यवसाय करावयाचा असल्यास प्रकल्प अहवाल बनविण्याबाबत मार्गदर्शन तसेच मुद्रा कर्ज योजना व जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्जाबाबतही ही या शिबीरात माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शासनाची विविध जाती-जमातीसाठी असलेली महामंडळे आपल्याकडील विविध योजनांच्या माहितीसह शिबीरास उपस्थित राहणार असुन या माध्यामातून उमेदवारांना रोजगार तसेच स्वयं रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

तरी जास्तीजास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहाय्क संचालकांमार्फत करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top