नालासोपर्‍यात अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या 5 तरुणांना अटक

0
9

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 13 : नालासोपारा पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या 5 तरुणांना गजाआड केले असुन नालासोपारा पश्‍चिमेतील डांगेवाडी व टाकीपाडा सोपारा गाव येथून या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

डांगेवाडी येथील तलावाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात तसेच टाकीपाडा सोपारा गाव येथे असलेल्या मोकळ्या मैदानात काही तरुण नियमित अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी सदर ठिकाणांवर छापा टाकला असता गुलाम मुस्तफा रजाक शेख (वय 36), अझरुद्दीन अब्बास शेख (वय 26), कय्युम सुखचांद मंडल (वय 22), नंदकिशोर हरींदर पासवान (वय 20) व नुरआलम अजगर शेख (वय 25, सर्व रा. नालासोपारा) असे एकुण 5 जण अमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आले.

यानंतर सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असुन पाचही आरोपींना काल, 12 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments