दिनांक 03 July 2020 वेळ 2:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » माकपच्या राज्य कमिटी बैठकीत आमदार विनोद निकोलेंचा सत्कार

माकपच्या राज्य कमिटी बैठकीत आमदार विनोद निकोलेंचा सत्कार

प्रतिनिधी/डहाणू, दि. 12 : नवी मुंबईतील बेलापूर येथे आज 12 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या माकपच्या राज्य कमिटी बैठकीत डहाणूचे नवनिर्वाचित आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांचा प. बंगालचे माजी मंत्री व माकप नेते कॉम्रेड निलोत्पल बसू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बसू यांनी आमदार निकोले यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी माकप नेते व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य महेंद्रसिंग, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top