दिनांक 04 July 2020 वेळ 2:07 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसर : १६ वर्षीय मुलाकडून 22 हजारांची घरफोडी

बोईसर : १६ वर्षीय मुलाकडून 22 हजारांची घरफोडी

स्थानिक गुन्हे शाखेकडुन 24 तासात आरोपीला अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 12 : मान येथील रुपरजत पार्कमधील एका घरात घरफोडी करुन 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास करणार्‍या आरोपीला काही तासांतच अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला यश आले आहे. सदर आरोपी अल्पवयीन असुन त्याची चौकशी करण्यात येत आहे.

मान येथील रुपरजत पार्कमध्ये राहणार्‍या शशिकांत गजानन पांडे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आले होते. यानंतर दुपारी 12.50 च्या सुमारास बोईसर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करुन पोलिसांनी लागलीच आपला तपास सुरु केला असता गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक पुराव्यावरुन काही तासातच संशयित 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. यानंतर त्याच्याकडून चोरीला गेलेली 4 हजार रुपये किंमतीची एक सोन्याची नाकातील फिरकी (नथ), 15 हजार रुपये किंमतीचे एक जोड कानातील कर्णफुले व 700 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव, सहा फौजदार विनायक ताम्हाणे, भरत पाटील, सुनिल नलावडे, पोलीस हवालदार दिपक राऊत, पोलीस नाईक नरेंद्र पाटील व संदिप सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, अटक करण्यात आलेला अल्पवयीन आरोपी मुळचा हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील रहिवासी असुन त्याने यापुर्वी देखील काही गुन्हे केले आहेत, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top