दिनांक 26 May 2020 वेळ 5:23 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात शिवसेना शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन

वाड्यात शिवसेना शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे संकटात असलेल्या बाधित शेतकर्‍यांना शासन दरबारी मदत मिळावी या उद्देशाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात शेतकरी मदत केंद्र सुरु करण्यात येत असून रविवारी (दि. 10) वाड्यात या मदत केंद्राचे उद्घाटन शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. अशावेळी शेतकर्‍यांना शासन दरबारातून मदत मिळवून देण्यासाठी केवळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी न करता शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते व पदाधिकारी जात आहेत. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी असून या मदतकेंद्राद्वारे शेतकर्‍यांच्या शेतीचे झालेले नुकसान, पिकविम्याचा प्रश्न, कर्जमाफीचे प्रश्न व प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आदी प्रकरणी शेतकर्‍यांना मदत करण्यात येणार असल्याचे मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार बरोरा यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, उप तालुका प्रमुख तुषार यादव, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, तालुका सचिव निलेश पाटील, तालुका समन्वयक प्रकाश केणे, तालुका संघटक अरुण अधिकारी, शहर प्रमुख नरेश चौधरी, माजी तालुका प्रमुख प्रकाश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे, जिल्हा उपसंघटक संगिता ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य भालचंद्र खोडका, किर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य नरेश काळे, स्नेहा जाधव आदींसह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top