दिनांक 20 February 2020 वेळ 11:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार : खड्डे चुकवताना एसटी बसला अपघात

जव्हार : खड्डे चुकवताना एसटी बसला अपघात

  • 25 प्रवाशी किरकोळ जखमी
  • बस वाहकाला गंभीर दुखापत

प्रतिनिधी/जव्हार, दि. 8 : दाभेरीहून जव्हार बस स्थानकात परतणार्‍या एसटी बसला अपघात झाला असुन रस्त्यातील खड्डा चुकवताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याखाली उतरल्याने यात 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर इतर जखमींवर जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात बस वाहकाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.

जव्हार डेपोतुन दुपारी 1.30 वाजता सुटणारी जव्हार-दाभेरी बस आज नेहमीप्रमाणे दाभेरीहून फेरी मारुन संध्याकाळच्या सुमारास जव्हार बस स्थानकात परतत होती. मात्र दाभेरी गावाजवळील एका वळणार खड्डा चुकवत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व अनियंत्रित झालेली बस थेट रस्त्याच्या खाली उतरली. सुदैवाने यावेळी बस मोरीच्या खड्ड्यात आदळून थांबल्याने मोठा अपघात टळला. या अपघातात बसमधील 30 पैकी 25 प्रवासी जखमी झाले असुन किरकोळ जखमींवर चालतवड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. तर इतर जखमींना अधिक उपचारासाठी जव्हार ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. बसच्या वाहकाला गंभीर दुखापत झाली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top