दिनांक 20 February 2020 वेळ 10:24 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 7 लाखांचा गुटखा पकडला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 7 लाखांचा गुटखा पकडला

कासा पोलिसांची कारवाई

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चोरोटी टोल नाक्यावर वाहनांच्या तपासणीदरम्यान एका टेम्पोमधुन 7 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कासा पोलिसांनी ही कारवाई केली असुन याप्रकरणी ट्रकचा चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल, गुरुवारी (दि. 7) संध्याकाळी 4.15 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चारोटी टोलनाक्यावर कासा पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एम. एच. 04/जे.यु. 5942 या क्रमांकाच्या टेम्पोला संशयावरुन अडवून तपासणी केली असता त्यात 7 लाख रुपये किंमतीचा गुटखा व विविध तंबाखुजन्य पदार्थ आढळून आले. यानंतर पोलिसांनी टम्पोचा चालक मोहम्मद शकील मोहम्मद रजा शहा (वय 25, रा. उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेत गुटखा व टेम्पो जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी मोहम्मद शहासह टेम्पोच्या मालकाविरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top