दिनांक 20 February 2020 वेळ 9:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » श्रमजीवी थांबवणार मोखाड्यातील बोट्याच्यावाडीचे स्थलांतर

श्रमजीवी थांबवणार मोखाड्यातील बोट्याच्यावाडीचे स्थलांतर

  • श्रमजीवीचा प्रायोगिक उपक्रम
  • एकत्रीत कुटुंबांचे पुनर्वसन
  • बारमाही रोजगाराची हमी
  • विवेक पंडितांचा निर्धार
संग्रहित छायाचित्र

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 8 : तालुक्यातुन सातत्याने होणार्‍या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने सर्जनशील पाऊल उचलले आहे. श्रमजीवीने बोट्याच्यावाडीची रोजगाराबरोबरच एकत्रित कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्विकारल्यामुळे तालुक्यातील बोट्याचीवाडी या छोटेखानी गावासाठी श्रमजीवीचा हा निर्धार वरदान ठरणार असून कायम रोजगार मिळाल्यानंतर येथील आदिवासींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन होऊन पर्यायाने कुपोषणाला आळा बसणार आहे.

मोखाडा तालुक्यातील बोट्याचीवाडी हे गांव तसं छोटेखानीच. परंतु येथील बहुजन आदिवासी समाजाच्या समस्या येथील जीवनमानाच्या मानाने आभाळाला गवसणी घालणार्‍या आहेत. त्यामुळे श्रमजीवीने लोकहिताच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल निश्चितच स्पृहणीय आहे. या पार्श्वभूमीवर श्रमजीवीने मोखाडा तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांसह विविध विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन या ठिकाणी बारमाही रोजगार, अन्नधान्य पुरवठा, आरोग्य सेवा आणि पोषण- शिक्षण याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची सूचना अधिकार्‍यांना केल्या आहेत.

एकत्रित कुटुंबांचे विभक्तीकरण
अगदी लहान झोपडीत दाटीवाटीने संसार मांडलेल्या बोट्याचीवाडीतील आदिवासी कुटूंबाना 11 एकर गावठाण जागेत प्लॉट देऊन घरकुले मंजूर करण्यात येणार आहेत. या गावठाण जागेची सरकारी मोजणी देखील करण्यात आली आहे. राजू बुधा वाघ, सुरेश बुधा वाघ, संजय जीवा वळवी, रविंद्र गुणा भोळे, प्रकाश धाऊ वाघ, गोरख मधु वळवी, नवनाथ मधु वळवी, रविंद्र मधु वळवी, भिका काळुराम वाघ, सोनू काळूराम वाघ, गणपत महादु बरफ, लहाणू काशिनाथ बरफ, काळू भागा बरफ, दिलीप भागा बरफ, बाळू हाल्या बरफ, रामदास पंडू सवरा, मंगेश रामदास सवरा, अंकुश भिका दिवे आणि प्रकाश बाळू वाघ या 19 कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे.

श्रमजीवीचा निर्णय, काळाची गरज
सन 2008 साली बोट्याचीवाडी महाराष्ट्रभर चर्चेत आली होती. निमित्त होते अविनाश हा पोटचा गोळा बरफ दांपत्याने अवघ्या 800 रुपयांमध्ये विकल्याचे, परंतु या घटनेने अवघा महाराष्ट्र पोटात गोळा येऊन हळहळला होता. या घटनेमुळे येथील भुकेचे, बेरोजगारीचे दशावतार उभ्या महाराष्ट्राने अनुभवले होते. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने पुढे टाकलेले हे पाऊल उचित आणि सत्पात्री पडलेले आहे. असे म्हणने वावगे ठरू नये.

comments

About Rajtantra

Scroll To Top