दिनांक 15 November 2019 वेळ 3:47 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात पुलावरील खड्ड्यांमुळे नदीपात्रात पडून एकजण जखमी

वाड्यात पुलावरील खड्ड्यांमुळे नदीपात्रात पडून एकजण जखमी

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : तालुक्यातील शिरीषपाडा ते पाली या मार्गावरील वैतरना पुलावरील खड्ड्यांमुळे एका दुचाकीला आज गुरुवारी अपघात झाला. यावेळी दुचाकीवरील तिघांपैकी एकजण थेट नदीपात्रात पडल्याने जखमी झाला असुन त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खरीवली येथील रहिवासी असलेले दीपक (पिंट्या) दिवा, कैलास मुकणे व दिलीप मुकणे असे तिघेजण एम.एच.04/डी. यु.469 या क्रमांकाच्या दुचाकीवरून शिरीष पाडा मार्गे पालीला जात असताना गांध्रे येथील वैतरना नदीवरील पुलावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यावेळी दुचाकीवर मागे बसलेला दीपक दिवा हा तरुण नदीपात्रात पडला. तर कैलास मुकणे व दिलीप मुकणे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, नदीपात्रात पाणी असल्याने दीपकचा जीव वाचला असला तरी त्याच्या पायाचे हाड मोडले असुन त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top