दिनांक 21 February 2020 वेळ 12:38 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » नालासोपार्‍यात 1 पिस्तुल व 7 काडतुसांसह एकाला अटक

नालासोपार्‍यात 1 पिस्तुल व 7 काडतुसांसह एकाला अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 7 : नालासोपारा पोलिसांनी 1 पिस्तुल व 7 जिवंत काडतुसांसह एकाला अटक केली असुन कैलाससिंग भगवतसिंग राजपुत असे सदर इसमाचे नाव आहे. स्वत:ला बांधकाम व्यवसायिक सांगणार्‍या राजपुतकडे पिस्तुल बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्‍चिमेतील सिविक सेंन्टर ते इंद्रप्रस्थ बिल्डींगकडे जाणार्‍या रस्त्यावर काल, 6 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी संशयावरुन कैलाससिंग राजपुतला अडवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 1 पिस्तुल व 7 जिवंत काडतुसे आढळून आली. यांनतर पोलिसांनी पिस्तुल व काडतुसे जप्त करत राजपुतला अटक केली आहे.

याप्रकरणी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3 व 25(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राजपुतने आपण बांधकाम व्यवसायिक असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत दिली असुन त्याने नेमक्या कोणत्या कारणासाठी हे हत्यार बाळगले होते, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top