दिनांक 17 January 2020 वेळ 9:37 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » रोजगार हमी योजनेचे तीन तेरा; मोखाड्यातील आदिवासींवर उपासमारीचे संकट

रोजगार हमी योजनेचे तीन तेरा; मोखाड्यातील आदिवासींवर उपासमारीचे संकट

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 6 : रोजगार हमी योजनेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 48 हजार कोटींची भरघोस तरतूद केली असा प्रचंड गाजावाजा सरकारने केला असला तरी या योजनेचे पार तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. मोखाड्यासारख्या दारिद्य्राने गांजलेल्या, कुपोषणग्रस्त तालुक्यात आदिवासी मजुरांना रोजगार हमीवर काम देण्यात आणि त्यांनी केलेल्या कामाची मजुरी देण्यात सरकारचा पूर्ण पराभव झाला आहे. या भागात महिन्याला सरासरी 4 मनुष्य दिवस सुद्धा काम उपलब्ध झालेले नाही, असे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

मागील आर्थिक वर्षातील मोखाड्यातील जॉबकार्ड धारकांची संख्या 15 हजार 467 इतकी आहे. तर प्रत्यक्ष काम करू शकणार्‍या मजुरांची संख्या 24 हजार 523 इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मजुरांना कामाची गरज असताना डिसेंबर 2018 मध्ये 3 हजार 638, जानेवारीत 11 हजार 565 आणि फेब्रुवारीत 14 हजार 339 इतक्या मजुरांना काम मिळू शकले. याचा अर्थ डिसेंबरमध्ये 100 पैकी अवघ्या 14 मजुरांना, जानेवारीत 100 पैकी 47 मजुरांना तर फेब्रुवारीत 100 पैकी केवळ 58 मजुरांना काम मिळू शकले. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे महिन्यातून सरासरी केवळ 4 दिवसाचंच काम मिळू शकल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

वास्तविकतः 2 ऑक्टोबरपासून रोहयोची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. परंतू मागणीचे प्रस्ताव, शेतीची कामे तसेच दिवाळी सणाच्या लंगड्या सबबी पुढे करुन संबंधित यंत्रणांकडून रोहयोची कामे लांबणीवर टाकली गेली. पर्यायाने स्थानिक मजुरांना कामाच्या शोधार्थ इतस्ततः भटकावे लागत आहे. आजमितीस सामाजिक वनीकरण विभागाकडील तुरळक कामे वगळता इतर कोणत्याही विभागाने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली नाही. स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने परिणामी बाहेरगावी जाणार्‍या मजुरांना विविध समस्यांशी सामना करावा लागत असून प्रसंगी जीवही गमवावा लागत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.

पगाराचीही परवड

  • रोहयो अंतर्गत कामे केलेल्या मोखाडा तालुक्यातील केवनाळा येथील मजुरांना त्यांच्या हक्काच्या आणि घामाच्या पैशांसाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने रोहयो यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवले जात आहे.
  • रोजगार हमी योजना ही नवसंजीवनी योजनेतील महत्वाचा भाग आहे. रोजगारा अभावी स्थलांतर व त्यायोगे संपूर्ण कुटुंब-कबिल्याच्या पोटाला टाच बसत असल्याने कुपोषण व बालमृत्यू या सार्‍या गोष्टी लक्षात घेऊन रोहयो प्रशासनाने तातडीने रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही संबंधित विभाग अजूनही सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
  • याबाबत श्रमजीवी संघटनेने मोखाडा तालुक्यातील 4 हजार 500 मजुरांसाठी तर जव्हार तालुक्यातील 2 हजार मजुरांसाठी कामांची मागणी नोंदवली असल्याचे श्रमजीवी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top