दिनांक 15 November 2019 वेळ 3:58 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसरमध्ये पादचार्‍याचा मोबाईल हिसकावणारा चोरटा गजाआड

बोईसरमध्ये पादचार्‍याचा मोबाईल हिसकावणारा चोरटा गजाआड

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 5 : दुचाकीवरुन भरधाव वेगात येऊन पादर्‍याचा मोबाईल हिसकावून लंपास करणार्‍या चोरट्याला गजाआड करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे. अभिषेक गोविंद पांडे (वय 23, रा. बोईसर) असे सदर चोरट्याचे नाव असुन त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.40 च्या सुमारास फिर्यादी व्यक्ती बोईसर एमआयडीसीतील लुपीन कंपनीच्या गेट नं.1 समोरील रस्त्यावरुन पायी चालत मोबाईलवर बोलत असताना काळ्या रंगाच्या 220 पल्सर दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्याच्या हातातील 10 हजार रुपये किंमतीचा फोन अचानक हिसकला होता व घटनास्थळावरुन पळ काढला होता. यानंतर फिर्यादीने बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बोईसर पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास करत गुन्ह्यात वापरली गेलेली दुचाकी व त्यावरील चोरट्याबाबत फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरुन अभिषेक पांडे या संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असुन त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top