दिनांक 17 January 2020 वेळ 9:09 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्याला महा चक्री वादळाचा धोका

पालघर जिल्ह्याला महा चक्री वादळाचा धोका

मच्छिमारांनी समुद्रात जावू नये ;  समुद्र किनारी राहणार्या रहिवाश्यांनी सतर्क राहावे! -जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 नोव्हेंबर 2019 : अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले असून हे चक्रीवादळ 6 नोव्हेंबर ते  8 नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. या वादळाचा  फटका पालघर जिल्ह्याला बसण्याची  शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जावू नये तसेच समुद्र किनारी राहणारे रहिवाशी यांनी सतर्क राहावे असे अवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केले आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील आपतकालीन यंत्रणांनी सज्ज राहावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आपतकालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या सर्व संबधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी या बैठकीत संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव पाटील उपस्थित होते.

मच्छिमारांनी समुद्रात जावू नये

जिल्ह्यातील मच्छिमारांनी पुढील तीन दिवस (दि. 8 नोव्हेंबर पर्यंत) मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे

तसेच सुट्टीचा कालावधी असल्याने समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेवून पर्यटकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले.  नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या मुंबई, पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल असेही ते म्हणाले.

कर्मचार्यांनी मुख्यालय सोडू नये: रजेवर असणाऱ्यांनी हजर व्हा!

पालिका, महसूल, आरोग्य, वैदकीय पथक, आपत्तीव्यवस्थापन आणि इतर सर्व यंत्रणाच्या अधिकारी- कर्मचारी वर्गाने मुख्यालयात राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  तसेच रजेवर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या रजा रद्द करून हजर होण्याचे सूचना दिल्या चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पत्र्याची कच्ची घरं, झोपड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पक्क्या घरामध्ये स्थलांतर करणे, शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली पिकं आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये यासाठी उपयोजना करण्याच्या सूचना निवासी उप जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी दिल्या .

comments

About Rajtantra

Scroll To Top