दिनांक 26 May 2020 वेळ 5:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विनवळ येथील भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

विनवळ येथील भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

प्रतिनिधी/जव्हार, दि. 4 : तालुक्यात परतीच्या पावसाची रिपरिप सुरु असुन शेतकर्‍यांनी कापणी केलेले भातपीक सततच्या पावसामुळे पुर्णपणे भिजुन गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विनवळचे तलाठी देविदास चौरे यांनी आज परिसरातील भात पिकाच्या नुकसानींचे पंचनामे केले असुन यामध्ये भात सडणे, भाताला मोड येणे व इतर नुकसानी संबंधी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडुन आधार कार्ड, बँक पासबुक व पंचनामा अर्ज भरुन घेतले आहेत. तलाठी चौरेंसह विनवळचे सरपंच संदिप खुताडे, पत्रकार जितेंद्र मोरघा, जितेश दिघा, जिग्नेश दिघा, अजय मोरघा, रामजी मोरघा व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या उपस्थित हे पंचनामे करण्यात आले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top