दिनांक 26 May 2020 वेळ 5:54 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मुदतीत विम्याचे पैसे न मिळाल्यास शेतकर्‍यांना मिळणार व्याज

मुदतीत विम्याचे पैसे न मिळाल्यास शेतकर्‍यांना मिळणार व्याज

प्रतिनिधी/कुडूस, दि. 3 : पंतप्रधान पीक योजनेचा लाभ शेतकर्‍यांना वेळेवर दिला जात नाही. याची दखल घेऊन केंद्र सरकारने विमा कंपनीने विहित मुदतीत शेतकर्‍यांना विम्याची रक्कम न दिल्यास 1 ऑक्टोबर 2019 पासून नियमानुसार जेवढा जास्तीचा काळ जाईल त्या कालावधीसाठी विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना 12 टक्के प्रमाणे व्याज द्यावे लागणार आहे.

या बाबत केंद्र सरकारने नियम केला असून विमा कंपनीसह राज्य सरकारच्या वतीने दिल्या जाणार्‍या भरपाईच्या रकमेवर 12 टक्के व्याज दिले जाणार आहे. विमा कंपनीकडून दोन महिन्यात नुकसान विमा रक्कम देण्यात यावी. याव्यतिरिक्त जास्तीच्या कालावधीसाठी कंपनीने शेतकर्‍यांना 12 टक्के प्रमाणे व्याज देणे बंधनकारक आहे. तर राज्य सरकारकडून दिल्या जाणार्‍या नुकसान भरपाईच्या रकमेवर तीन महिन्यापेक्षा जास्तीच्या कलावधीसाठी देखील 12 टक्के व्याज शेतकर्‍यांना द्यावे लागेल. म्हणजेच या नवीन नियमानुसार शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यास विलंब झाल्यास एकूण 24 टक्के व्याज मिळणार आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिना उजाडला तरीही पाऊस पडत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सुरवातीला सततच्या पावसाने छोटी रोपे कुजली. पुढे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणून रोपे चांगली झाली. मात्र ऐन कापणीच्या वेळेत पाऊस कोसळत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीसाठी मोठी रक्कम खर्च केली. मात्र उत्पन्न हाती लागत नसल्याने शेतकरी निराशेने ग्रासले आहेत. शेतकरी संघटनांनी तहसीलदार यांना याबाबत निवेदने देऊनही वेळेत पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कर्ज आणि महागाई यांच्या कात्रीत शेतकरी सापडला आहे, असे किसान सभा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माधव चौधरी यांनी बोलताना सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top