दिनांक 15 November 2019 वेळ 3:03 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान; डहाणूतील शेतकर्‍याची आत्महत्या

परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान; डहाणूतील शेतकर्‍याची आत्महत्या

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 1 : डहाणू तालुक्यातील धरमपुर-शिडवापाडा येथे राहणार्‍या धर्मा जाधव या शेतकर्‍याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या नैराश्येतून जाधव यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

यंदा पाऊस लांबल्याने पालघर जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अगोदरच ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा येथील शेतीला मोठा फटका बसलेला असताना आता परतीच्या पावसाने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे केले. त्यामुळे चिंतातूर झालेला जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत. असे असताना धर्मा जाधव या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. परतीच्या पावसाने शेतातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मागील काही दिवसांपासुन जाधव निराश झाले होते व यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणाची कासा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top