दिनांक 24 February 2020 वेळ 7:44 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » एसटी बसची दुचाकीला धडक, 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

एसटी बसची दुचाकीला धडक, 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • वाडा येथील घटना
  • कोल्हापूर-डहाणू बसच्या चालकाला अटक

प्रतिनिधी/वाडा, दि.31 : वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. काल, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

जयेश लखमा गुरव (रा.आलोंडा, ता. विक्रमगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयेश हा कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरुन आलोंडा येथील आपल्या घरी परतत होता. दरम्यान पाली येथील पेट्रोलपंपावरून गाडीत पेट्रोल भरून बाहेर पडत असताना वाड्याहुन पालीच्या दिशेने भरधाव वेगात असलेल्या कोल्हापूर-डहाणू या बसने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या जयेशला स्थानिक नागरिकांनी तात्काळ वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव यांनी त्याला अधिक उपचारासाठी ठाणे येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र ठाणे येथे नेण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी कोल्हापुर-डहाणू बसचा चालक गणेश सुभाष कोकणे याला वाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top