दिनांक 26 May 2020 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पालघर येथे राष्ट्रीय एकता दौड संपन्न

वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पालघर येथे राष्ट्रीय एकता दौड संपन्न

प्रतिनिधी/डहाणू, दि. 31 : देशाचे माजी उप प्रधानमंत्री तथा गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पालघर येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमामध्ये पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, निवासी उप जिल्हाधिकारी संदिप जाधव, बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, पालघरचे तहसिलदार सुनिल जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी माधव मते, नायब तहसिलदार केशव तंरगे, दिपक गडग, आदि सहभागी झाले होते.

सकाळी आठ वाजता हुतात्मा स्तंभ येथे जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला प्रारंभ झाला. या दौडमध्ये पोलिस विभाग, जिल्हापरिषद, तसेच विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पालघर येथील हुतात्मा स्तंभ (पाचबत्ती) येथून प्रारंभ झालेली ही दौड प्रकाश टॉकीज – आर्यन हायस्कूल – तहसिल कार्यालय अशी मार्गक्रमण करुन पुन्हा हुतात्मा स्मारक येथे दौडचा समारोप झाला. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top