दिनांक 24 February 2020 वेळ 8:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विधानसभा निवडणूक : जिल्ह्यातील 21 सराईत गुन्हेगार स्थानबध्द

विधानसभा निवडणूक : जिल्ह्यातील 21 सराईत गुन्हेगार स्थानबध्द

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 20 : उद्या, 21 ऑक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभेच्या निवडणूका शांततेत पार पडाव्यात व कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न उद्भवू म्हणून जिल्हाभरातील 21 सराईत गुन्हेगारांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कायदा कलम 151 (3) नुसार अटक करुन स्थानबध्द करण्यात आले आहे.

रंजित विजय ठाकुर, महेंद्र सिंग कुशबिर अरोरा, सुधिर हेमंत सोंगळे, इमरान इस्माईल शेख, रुपेश वसंत पाटील, दत्तु जीवल्या मालकरी, माधव रडका दुबळा, दिलीप नवश्या दुमाडा, रामा लखमा बारगा, महेश करसन धोडी, सुरेश नावजी सुतार, राजेंद्र कुंदन सिंग, अशोक मोहन कामडे, शनि शंकर मल ऊर्फ वाघरी, रमन वशा वजरे, दत्ता शंकर पवार, संजय शितल्या म्हसे, गणपत भादल्या सुरुम, अनिल चंदु आहडी, रुपेश नावजी सुतार, हरेश रुपजी शिंगाडा व शाहरुख दाहेद खान असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे असुन या गुन्हेगारांकडून दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणुकांसाठी पालघर पोलीस 24 तास सतर्क व सजग आहेत. कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये व अफवांवर विश्वास ठेवु नये. तसेच आपल्याला कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पालघर पोलीस नियंत्रण कक्ष किंवा नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :- 8669604100, 9730711119, 9730811119

comments

About Rajtantra

Scroll To Top