दिनांक 24 February 2020 वेळ 6:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आदिवासी समाजाच्या आरक्षणाला बाधा येणार नाही! -एकनाथ शिंदे

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला बाधा येणार नाही! -एकनाथ शिंदे

वार्ताहर/पालघर, दि. 14 : आदिवासी समाज हा येथील मूळ रहिवासी असुन आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शिवसेना करत आहे, असे सांगतानाच आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणापैकी एक टक्का आरक्षण देखील कमी होणार नाही, असे आश्‍वासन शिवसेना नेते तथा आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातील रानशेत येथे श्रीनिवास वनगा यांच्या प्रचार सभेदरम्यान शिंदे बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले, चिंतामण वनगा हे गोरगरिबांचे नेते होते. आता त्यांचा वारसा चालवण्याचे काम श्रीनिवास वनगा नक्की करतील. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी वाढवण बंदाराला विरोध करुन ते खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहिले होते. बाळासाहेबांप्रमाणेच जनतेचा ज्या प्रकल्पांना विरोध असेल, अशा सर्व प्रकल्पांविरोधात शिवसेना जनतेच्या पाठीशी राहणार आहे, असे शिंदे म्हणाले. दिलेला शब्द शिवसेना पाळते, म्हणून शिवसेनेवर जनतेचा विश्वास आहे. शिवसेना दिलेल्या शब्दाला जागणारी संघटना असल्याने या विधानसभा निवडणूकांमध्ये महायुती बहुमताने निवडणून येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, खासदार राजेंद्र गावित, आमदार अमित घोडा, लोकसभा समन्वयक प्रभाकर राऊळ, लोकसभा सहसंपर्क प्रमुख केदार काळे, पालघर विधानसभा संपर्क प्रमुख प्रशांत रात, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, उपजिल्हा प्रमुख राजेश कुट्टे, संतोष शेट्टी, वैभव संखे, उपजिल्हा महिला संघटक वैदेही वाढाण, युवा अधिकारी जस्वीन घरत, तालुका प्रमुख अशोक भोईर, निलम म्हात्रे, पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे, सतीश मेहेर, मनोज संखे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी पालघर मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार योगेश शंकर नम यांचे भाऊ सुधीर नम यांनी डहाणू रानशेत येथील सभेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top