दिनांक 24 February 2020 वेळ 8:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जव्हारमध्ये

महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जव्हारमध्ये

प्रतिनिधी/वाडा, दि.16 : जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, गुरुवारी (दि.17 ऑक्टो.) जव्हार येथे येत असून सकाळी 11 वाजता जव्हारमधील राजीव गांधी स्टेडियम येथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे.

जव्हार येथील मुख्यमंत्र्यांची ही सभा विक्रमगड विधानसभा मतदारसंघात होत असून या ठिकाणी महायुतीकडून भाजपाचे डॉ. हेमंत विष्णू सवरा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांची ताकद असून त्यांच्यासोबत श्रमजीवी संघटना, कुणबी सेना व आरपीआय हे घटक पक्ष-संघटना यांचीही ताकद महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या मागे उभी राहिल्याने डॉ. सवरा यांचे पारडे जड झाले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top