दिनांक 18 January 2020 वेळ 11:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » 370 कलम रद्द केल्याबद्दल भाजपला मतदान होईल! -शिक्षण मंत्री विनोद तावडे

370 कलम रद्द केल्याबद्दल भाजपला मतदान होईल! -शिक्षण मंत्री विनोद तावडे

डहाणू येथे पत्रकारांशी साधला संवाद

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 10: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संविधानातील कलम 370 रद्द करुन इतिहासातील एक मोठी चूक दुरुस्त केली आहे. त्याबद्दल लोक भाजपला भरघोस मतदान करतील, असा विश्वास राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या भुमीकेद्वारे भाजप मोदी लाटेच्या आधारावरच राज्याच्या निवडणूकीला सामोरे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपाचे स्टार प्रचारक विनोद तावडे यांची आज डहाणू येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले आमदार पास्कल धनारे, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी बापजी काटोळे, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत व माध्यम समन्वयक पुंडलिक भानुशाली उपस्थित होते. यावेळी तावडे यांनी केंद्र व राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय व योजनांबाबत माहिती दिल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तथापि एकाही स्थानिक प्रश्नाबाबत समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. आमदार धनारे यांनीही पूर्णपणे मौन बाळगले होते.

आमदार धनारे यांनी तलासरी नगरपंचायतीच्या निवडणूकीवेळी उत्पादन शुल्क विभागाकडून दारुच्या बाटल्यांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. धनारे यांनीही हक्कभंगाची तक्रार केली होती. याप्रकरणी काय चौकशी व कारवाई झाली? या प्रश्नाचे, चौकशी चालू आहे, चौकशीला विलंब लागत असतो, असे गोलमाल उत्तर मिळाले.

एकीकडे पालघर जिल्हा मुख्यालय बांधणीसाठी व त्यातील फर्निचरसाठी शासनाने शेकडो एकर जमीन सिडकोला आंदण दिली असताना, जिल्हा रुग्णालयासाठी शासन पालघरमध्ये 25 एकर जमीन का देऊ शकत नाही? या प्रश्नाला, जिल्हा मुख्यालयामध्ये जिल्हा रुग्णालयाची व्यवस्था करण्याची मुख्यमंत्र्याची योजना असल्याचे थापेबाज उत्तर मिळाले.

वाढवण बंदर व अन्य महाकाय प्रकल्पामुळे होणार्‍या पर्यावरण हानीबाबत प्रश्न विचारला असता, असे प्रकल्प राबवताना पर्यावरणावर होणार्‍या परिणामांचा सखोल अभ्यास केला जातो, तसेच लोकभावनाही विचारात घेतली जाते अशी भूमिका तावडे यांनी मांडली व स्थानिक प्रश्नांवर स्थानिक पुढार्‍यांची स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, आपल्या 5 वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात एकदाही पत्रकार परिषदेला सामोरे न गेलेले धनारे यांनी मौन राखून निराशा केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top