दिनांक 18 January 2020 वेळ 12:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा-भिवंडी महामार्गावर खड्ड्याने घेतला तरुणीचा बळी

वाडा-भिवंडी महामार्गावर खड्ड्याने घेतला तरुणीचा बळी

  • 23 वर्षीय तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
  • लग्नानिमित्त खरेदी करुन परतत असताना अपघात
  • संतप्त गावकर्‍यांनी टोलनाका केला बंद

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : वाडा-भिवंडी राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे एका निष्पाप तरुणीला आपले प्राण गमवावे लागले आहे. काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास दुगाड फाटा येथे खड्ड्यात दुचाकी आळल्याने रस्त्यावर पडलेल्या 23 वर्षीय तरुणीला मागून येणार्‍या ट्रकने चिरडले. यात सदर तरुणीचा जागीच मृत्यू झाला असुन या घटनेने संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी येथील टोल नाका बंद केला आहे.ˆ

डॉ. नेहा आलमगीर शेख असे मृत तरुणीचे नाव असून ती कुडूस येथील रहिवासी होती. येत्या 8 नोव्हेंबर रोजी तिचे लग्न निश्चित झाले होते व यानिमित्ताने ती काल, बुधवारी नातेवाईकांसह ठाणे येथे खरेदीसाठी गेली होती. खरेदीनंतर आपल्या चुलत भावासह अ‍ॅक्टिव्हा या दुचाकीवरून घरी परतत असताना महामार्गावरील दुगाडफाटा येथील खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. यामुळे मागच्या सीटवर बसलेली नेहा रस्त्यावर पडली व दुर्दैवाने याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या
अज्ञात ट्रकने तिला चिरडले. यात नेहाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, गुरुवारी सकाळी या अपघाताच्या निषेधार्थ कुडूस येथे श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. यावेळी वाडा-भिवंडी महामार्गाची ठेकेदार कंपनी असलेल्या सुप्रीम कंपनी विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच येथील टोल नाका देखील बंद करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top