बोईसरमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर छापा; 16 जुगार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

0
1270
  • 1.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 7 : येथील शिवाजीनगर भागातील एका इमारतीत सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत एकुण 16 जुगार्‍यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांच्याकडून 1 लाख 82 हजारांची रक्कम जप्त केली आहे. बोईसर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

शिवाजीनगर-सालवड हद्दीतील संतोषी बार असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर केदार परशुराम राऊत (वय 23) या तरुणाचा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये हा जुगाराचा अड्डा सुरु होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर काल, रविवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास बोईसर पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने येथे छापा टाकला. यावेळी केदार राऊतसह माणीक शिवमुर्ती मेळकुंडे (वय 45, रा.चित्रालय, म्हाडा वसाहत), हरेंद्र अदालत गुप्ता (वय 35, रा.आत्मशक्ती नगर, पास्थळ), अनमोल आनंद चावरे (वय 23, रा.सालवड, भंडार आळी), हितेश दशरथ संखे (वय 31, रा. कचेरी रोड, पालघर), अक्षय सखाराम पाटील (वय 29, रा. कोळगाव, पालघर), राहुल वसंत हिंगोले (वय 31, रा.भिमनगर, बोईसर), दत्ता आनंदा हिंगोले (वय 26, रा.दांडीपाडा बोईसर), रोहीत विलास वडे (वय 33, रा.टेंभी बोईसर), पराग सुरेश पाटील (वय 40, रा. कोलवडे बोईसर), ज्वाल गुलाब गिरी (वय 20, रा. शिवाजी नगर बोईसर), विनोद व्यास तिवारी (वय 20, रा. शिवाजी नगर), श्याम देवेंद्र डुबे (वय 20, रा.शिवाजी नगर), रोहीत जर्नादन पिंगळे (वय 40 वर्षे, रा.दापोली, पालघर), रमाकांत गोविंद संखे (वय 48, रा.दापोली), प्रदीप भुल्लनसिंग ठाकुर (वय 42, रा.वेवुर,पालघर) असे एकुण 16 जण आतुन दरवाजा बंद करुन तिन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले.

दरम्यान, या जुगार्‍यांकडून पोलिसांनी एकुण 1 लाख 82 हजार रुपयांची रक्कम जप्त केली असुन याप्रकरणी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगारबंदी कायद्याचे कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments