दिनांक 25 May 2020 वेळ 1:35 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे!

जव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे!

एसटी सेवा बंद करण्याबाबत आले होते पत्र

प्रतिनिधी/जव्हार, दि. 20 : माळघर ते वावर वांगणी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे सांगत, एसटी महामंडळाने वावर वांगणीच्या सरपंचांना पत्र पाठवून या मार्गावरील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळवले आहे. त्यामुळे एसटी सेवा बंद होऊ नये म्हणून या परिसरातील नागरिकांनी काल, गुरुवारी स्वत: श्रमदान करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले आहेत.

माळघर ते वावर वांगणी या 13 कि.मी. रस्त्याचे तीन वर्षापूर्वी पंतप्रधान सडक योजनेतून काम करण्यात आले आहे. तर या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे अजूनही ठेकेदाराचीच जबाबदारी आहे. मात्र रस्त्याचे काम पुर्ण केल्यानंतर संबंधित ठेकेदार मागील तीन वर्षात येथे फिरकला सुद्धा नाही. परिणामी या रस्त्यावर मोठं-मोठाले खड्डे पडून काही ठिकाणी रस्त्यावरील मोर्‍या तुटून रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे येथे एसटीची सेवा देताना चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच एसटी चालवणे देखील धोक्याचे झाले आहे, असे सांगत या मार्गावरील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद झाल्यास या भागातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, कर्मचारी अशा सर्वांचीच होणारी गैरसोय पाहता ठेकेदार किंवा शासनाची वाट न पाहाता येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. वावर वांगणीचे सरपंच विजय शिंदे, उप सरपंच यशवंत बुधर, जिल्हा परिषद सदस्य रतन बुधर आदी या श्रमदानात सहभागी झाले होते

दरम्यान, वावर वांगणी भागात जवळपास 15 गावं असून, नाशिक जिल्हातील काही गावं, तसेच सिल्वासा आणि गुजरातचा भाग लागून असल्याने या परिसरातील नागरिकांना सगळ्याच कामांसाठी जव्हार शहरच सोयीस्कर पडते. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी एसटी हीच लाईफलाईन ठरत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top