दिनांक 25 May 2020 वेळ 1:40 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » नालासोपार्‍यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा

नालासोपार्‍यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 20 : तालुक्यातील नालासोपारा येथील आयटीआय गोल्ड लोन या कंपनीच्या शाखेत शुक्रवारी सकाळी सहा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा घातल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असुन दरोड्यानंतर पोबारा केलेल्या दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान, ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असुन पोलिसांतर्फे सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने दरोडेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

नालासोपार्‍यातील तुळींज परिसरात आयटीआय गोल्ड लोन फायनान्स कंपनीची शाखा आहे. शुक्रवारी सकाळी नियमितपणे या शाखेत कामकाज सुरु झाल्यानंतर काही वेळातच तोंडाला रुमाल बांधलेल्या आणि मंकीकॅप घातलेल्या सहा सशस्त्र दरोडेखोरांनी शाखेत प्रवेश केला व येथील कर्मचार्‍यांना शस्त्राचा धाक दाखवत सोनं व पैसे लुटून पोबारा केला.

दरम्यान, दरोड्याची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असुन शाखेतील आणि बाहेरील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांच्या शोधासाठी विशेष पथक तयार करुन तपास सुरु केला आहे. तसेच दरोडेखोर ज्या वाहनाने आले होते, ते वाहन शाखेच्या बाहेरच सोडून दुसर्‍या वाहनातून अथवा रेल्वेने त्यांनी पळ काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे दरोडेखोरांनी नेमका किती किंमतीचा ऐवज लुटला आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दरोडेखोरांचे वर्णन खालील प्रमाणे :

आरोपी क्रमांक 1 – अंगात मरून कलरचा फुल टी-शर्ट कॅपसह शिवाय स्वतंत्र ग्रे कलरची टोपी, अंगाने सडपातळ, नेसणीस काळी रंगाची फुल पॅन्ट, पायात काळाया कलरचे स्पोर्टशूज, अंदाजे पाच फूट उंची.
आरोपी क्रमांक 2 – अंगात ग्रे कलरचा फुल टी शर्ट, काळी पॅन्ट, अंगाने सडपातळ, उंची अंदाजे साडेपाच फूट.
आरोपी क्रमांक 3 – अंगात निळा रंगाचा चेकचा टी-शर्ट, काळी पॅन्ट, पायात चॉकलेटी रंगाचे शूज, अंगाने सडपातळ, उंची सुमारे साडेपाच फूट.
आरोपी क्रमांक 4- अंगात ब्लॅक फुल टी शर्ट व त्याच्या पुढील भागात सफेद रंग, राखाडी रंगाची फुल पॅन्ट, पायात राखाडी स्पोर्टशूज, अंगाने सडपातळ, थोडे पोट सुटलेले, उंची अंदाजे पाच फूट.
आरोपी क्रमांक 5 – अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट व त्याच्या पुढील भागात लाल व काळे पट्टे, पायात सफेद शूज, डोक्यावर पिंक मंकी कॅप, अंगाने मध्यम, उंची अंदाजे पाच फूट.
आरोपी क्रमांक 6- अंगात काळा फुल टी-शर्ट व त्याच्या खांद्यावरुन काळ्या रंगाची लोअर, पायात काळे स्पोर्ट शूज, अंगाने बारीक, उंची अंदाजे साडेपाच फूट.

सदर वर्णनाचे इसम कुठेही आढळून आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

  • पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील – 9777241069, 9870314076.
  • पोलीस निरीक्षक मुदलियार – 9821485656.
  • एसडीपीओ नालासोपारा श्री परदेशी – 8669604070.
  • सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड – 8390922470
  • सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धवा जायभाये – 8329037657
  • तुळिंज पोलीस स्टेशन -869604029/28.
  • पालघर नियंत्रण कक्ष 8696094100, 9730811119

comments

About Rajtantra

Scroll To Top