दिनांक 21 October 2019 वेळ 3:22 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » एलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप

एलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप

प्रतिनिधी/जव्हार, दि. 19 : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त विमा सप्ताह साजरा करण्यात येत असुन ठाणे विभागीय कार्यालया अंतर्गत येणार्‍या डहाणू शाखेच्या वतीने तालुक्यातील वावर वांगणी येथील पूरग्रस्त व गरिब कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यात तांदूळ, गहू, तेल, मीठ, साखर, डाळ, उसळ आदी धान्याचा समावेश आहे. यावेळी एलआयसीचे शाखा प्रबंधक विलास बेलकर, रमेश गवारी, सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी, वावर वांगणीचे सरपंच विजय शिंदे, उपसरपंच यशवंत बुधर, वावर वांगणी शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. परदेशी, पत्रकार तुळशीराम चौधरी, सुरेश बुधर, माजी सरपंच रोहिदास महाले तसेच गावातील आदिवासी कुटुंब व महिलावर्ग उपस्थित होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top