दिनांक 25 May 2020 वेळ 12:10 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या

वाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या

उपचार नको, पण कुत्रा आवर म्हणण्याची रुग्णांवर वेळ

प्रतिनिधी/वाडा, दि.19 : वाडा ग्रामीण रुग्णालयाला कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असुन रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभागाचा परिसर विनाकारण दिवस-रात्र उघडा ठेवला जात असल्याने येथे दिवसा कुत्र्यांचा वावर दिसुन येत आहे. तर रात्री दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचेही सांगण्यात येते.

वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी 9.30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत व संध्याकाळी 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंतची असली तरी या विभागाचे प्रवेशद्वार सताड उघडेच असते. अनेक वेळा येथील डॉक्टर व इतर कर्मचारी उशिरा येतात व लवकर निघून जातात. त्यामुळे बाह्यरुग्णांना उपचाराअभावीच परतावे लागते. याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रुग्णमित्र भीमराव बागुल यांनी केला आहे. त्यातच थेट बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात कुत्र्यांचा वावर दिसुुन येत असल्याने उपचार नको, पण कुत्रा आवर म्हणण्याची वेळ येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांवर आली आहे.

दरम्यान, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून बाह्यरुग्ण विभागात अंधार असल्याने दारुड्यांचे फावते व येथे दारुच्या पार्ट्या रंगत असल्याचे बोलले जाते. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही दिवे लावण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रुग्णमित्र बागुल यांनी म्हटले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top